लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २९ ऑगस्ट रोजी लातुर – बार्शी रस्त्यावर रस्त्यावर शासकीय महिला तंत्रनिकेतन ते विमानतळ दरम्यान सुरु असलेल्या रस्ता महामार्ग कामाची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान या पाहणी दरम्यान रस्ता कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखून याठिकाणी करण्यात येणा-या ड्रेनेजचे काम, पाण्याचे व्यवस्थापन याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकारी यांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केल्या. यावेळी विलास सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, ट्वेन्टी वन शुगर्स व्हा. विजय देशमुख यांची उपस्थिती होती.