27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी शिवकथेत केली महाआरती

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी शिवकथेत केली महाआरती

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी लातूर शहरातील विशालनगर येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथील संगीतमय शिवकथा व परम् रहस्य पारायण सोहळ्यास उपस्थित राहून महाआरती केली.
श्री काशी विश्वेश्वर मंदीर येथे श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे शिवकथा व परम्रहस्य पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या सोहळयास भेट दिली.  शिवकथा ऐकली आणि श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी ज्ञानपीठ काशी व शिवकथाकार अमृतेश्वर शिवाचार्य महाराज  व डॉ. शांतवीरलींग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद  घेतले. यावेळी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी महापौर दीपक सूळ, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अ‍ॅड. गंगाधरप्पा हामणे, बसवंतअप्पा भरडे, भालचंद्रप्पा मानकरी, बिराजदार, पंचाक्षरी, जितेंद्र स्वामी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी शिवभक्त्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR