लातूर : प्रतिनिधी
मराठवाडा मुक्त्ती संग्राम दिनानिमित्त राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १७ सप्टेंबर रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील हुतात्मा स्मारकस्थळी जाऊन मराठवाडा मक्ती संग्राम लढ्यातील हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करुन आपल्या सहकार्यासमवेत विनम्र अभिवादन केले.
दरम्यान यावेळी त्यांनी या ठिकाणी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विलास सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन- रवींद्र काळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिताताई खानापूरे, माजी नगराध्यक्ष-लक्ष्मण कांबळे, संतोष देशमुख, माजी नगरसेवक-दत्ता लो खंडे, सेवादलाचे सुपर्ण जगताप, इम्रान सय्यद, डॉ बी. आर. पाटील, शाम जैन, राहुल देशमुख, सुनील गायकवाड, पांडुरंग देडे, रहीम शेख, चंद्रकांत धायगुडे, पिराजी साठे यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.