लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २९ डिंसेबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संघटना संस्थांचे पदाधिकारी नागरिक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या तसेच त्यांच्या निवेदनाचा, निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना तात्काळ पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी माढा मतदारसंघाचे माजी आमदार धनाजी साठे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, सीए प्रकाश कासट, उद्योजक हुकूमचंद कलंत्री, माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव मस्के, प्राध्यापक प्रवीण कांबळे, अविनाश देशमुख, प्रा. सुधीर अनवले, नरेंद्र काळे, प्रीती नरेंद्र काळे, विश्वकर्मा सेवा चॅरिटेबल ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष हरिश्चंद्र पांचाळ, विठ्ठल पांचाळ, नामदेव पांचाळ, मोहन सुरवसे, सचिन बंडापले, गोटू यादव, राजकुमार जाधव, शिवाजी देशमुख, एडवोकेट अंगद गायकवाड, अजित माने, अमर खानापुरे, यशपाल कांबळे, अॅड. दीपक राठोड, अक्षय शहरकर, मारुती झाकणे, यशवंत पवार, गोपाळ सरवदे, रमेश साळुंके, साहेबराव ईटकर, बळीराम बंडगर, सोजरबाई सखाराम मचाले, भाऊसाहेब भडीकर, राहुल देशमुख, राजकुमार कंजे, रोहित देशमुख, किरण बनसोडे, लोकसेवा मोटार मेकॅनिकल कामगार संघटना लातूरचे संस्थापक अध्यक्ष अब्दुलखदीर शेख, शरीफ दुरानी, रफीक सय्यद, रियाजोद्दीन शेख, राजकुमार जाधव, संग्राम सांगलीकर, मेहबूब पठाण, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, युसूफ बाटलीवाला, प्रवीण घोटाळे, फारुख शेख, बिभीषण सांगवीकर, तुळशीराम गंभीरे, संजय माने, सुरेश धानुरे, फक्रोद्दीन पटेल, सुभाष गंभीरे, राजू गवळी, पत्रकार विनोद चव्हाण, डी. उमाकांत, गोटू यादव, चंद्रकांत साळुंखे, असलम शेख, सुलेखा कारेपूरकर, व्यंकटेश पुरी, डॉक्टर व्यंकट जाधव, राजकुमार होळीकर, महेश नागलगावे, मकबूल वलांडीकर, हरिभाऊ गायकवाड, ओमप्रकाश झुरळे, चेतन पंढरीकर, ओम मालपाणी, गिरीश पेनसलवार, अमोल दाडगे, मोतीलाल वर्मा, सत्तार शेख आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.