22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाच्या विभागीय बैठकीच्या  तयारीचा घेतला आढावा

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाच्या विभागीय बैठकीच्या  तयारीचा घेतला आढावा

लातूर : प्रतिनिधी
आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २९ जानेवारी रोजी लातूर येथे काँग्रेस पक्षाची मराठवाडा विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या सहकार्याच्या समवेत हॉटेल ग्रँड सरोवर परिसरात भेट देऊन सदरील बैठकीसाठी करावयाच्या व्यवस्थांची पाहणी  केली व सहकार्यांना काही सूचनाही केल्या आहेत.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर विभागवार पक्ष पदाधिकारी बैठकांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मराठवाडा विभागाची एक दिवसीय विभागीय आढावा बैठक लातुर या ठिकाणी सोमवार दि. २९ जानेवारी रोजी ग्रँड हॉटेल बार्शी रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस येणा-या मराठवाडा विभागातील पक्ष पदाधिकारी व पक्षाचे वरिष्ठ नेते मान्यवरांच्या करीता लातुर शहर जिल्हा काँग्रेसकडून सद्या तयारी करण्यात येत  आहे. या तयारीचा आढावा राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या सहकार्याच्या समवेत शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी पाहणी केली. यासोबतच लातुर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीला आवश्यक सूचना
केल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातुर शहर जिल्हा अध्यक्ष किरण जाधव, अभय साळुंके, एकनाथ पाटील, समद पटेल, रविंद्र काळे, प्रवीण पाटील, बाबासाहेब गायकवाड, इसरार सगरे, सिकंदर पटेल, व्यंकटेश पुरी, प्रा. प्रवीण कांबळे, ओमप्रकाश झुरुळे, सुपर्ण जगतात, अभिजित पतंगे, पप्पू घोलप, विपुल हाके यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR