22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा विलास कारखान्यातर्फे सत्कार 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा विलास कारखान्यातर्फे सत्कार 

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत काँगे्रस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. शिवाजी काळगे हे ६२ हजार मतांनी विजयी झाले आहेत. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यासह महारा्ट्रात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानिमित्ताने विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
काँग्रेस महाविकास आघाडीच्या यशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले आहे. या बद्दल विलास कारखाना संचालक मंडळाने दि. ११ जून रोजी  राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची आशियाना निवासस्थानी भेट घेऊन व्हाईस चेअरमन रविंद्र काळे आणि संचालकांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार केला.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, संचालक सर्वश्री अनंत बारबोले, भैरवनाथ  सवासे, गुरुनाथ  गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजीत  पाटील, गोविंद डुरे, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडिले, काँग्रेसचे लातूर तालुका अध्यक्ष सुभाष घोडके आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR