24.8 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरमारुती मंदीराच्या विकास कामासाठी  निधी कमी पडू देणार नाही -दिलीपराव देशमुख

मारुती मंदीराच्या विकास कामासाठी  निधी कमी पडू देणार नाही -दिलीपराव देशमुख

निलंगा : प्रतिनिधी
माकणी येथील  हनुमान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे या गावाला दैविशक्त्ती आहे. आता या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळालेला आहे ही विकासाची सुरवात असून या मंदिराला विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली ते निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील भक्त्त निवास व विविध विकास कामांचे भूमिपूजन  शुक्रवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या  हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की मी जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना जिल्ह्यातील विविध गावात मंदिराला भेट दिली तिथे विकास कामे करण्याचा प्रयत्न केला परंतु या गावाला भेट देता आली नाही, असे सांगून या माकणी थोर येथील हनुमान मंदीराला तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळालेला असून विकासाची कामे सुरु झालेली आहेत आगामी काळात अतिशय विकसित झालेले हे माकणी गाव दिसेल याबाबत ग्रामस्थ व भक्तांनी निश्चींत राहावे असे सांगून विकासाला निधि कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली
तत्पूर्वी माकणी थोर येथील हनुमान मंदीरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांचे स्वागत केले. यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील सौ वनमाला आबासाहेब पाटील, माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विक्रम माकणीकर, मधुकरअण्णा माकनिकर, परमेश्वर सूर्यवंशी, अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, अ‍ॅड. प्रमोद जाधव, विजयकुमार पाटील, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिन दाताळ, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य चेवले, संभाजी सुळ, संभाजी रेड्डी आदी मान्यवर भक्तगण मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR