25.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमहाराष्ट्रमालवण घटनेच्या निषेधार्थ अजित पवार गटाचे आंदोलन

मालवण घटनेच्या निषेधार्थ अजित पवार गटाचे आंदोलन

नागपूर : मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. त्या निषेधात राज्यभरातून संताप व्यक्त जात असून, शिवभक्ताकडून राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे कोथळे बाहेर काढले जात आहेत. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून नागपूरसह राज्यभर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणा-या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मूक आंदोलन करण्यात येत आहे. नागपूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. तर या आंदोलनावर ताशेरे ओडत खासदार संजय राऊ त यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अजित पवार गटाकडून आयोजित केलेल्या आंदोलनात मोठी गर्दी पहावयास मिळाली. यावेळी आंदोलकांनी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. दरम्यान, सत्तेत असून, सरकारविरोधात आंदोलन करणा-या अजित पवार गटामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यभर मूक आंदोलनाची हाक दिली आहे. अवघ्या आठ महिन्यांत महारांजांचा पुतळा कोसळला, ही धक्कादायक बाब आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

अजितदादा आंदोलन काय करता, राजीनामा द्या: संजय राऊत
दरम्यान, शिवरायांचा पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्ठाचार झाला आहे. कुणी किती पैसे खाईल ते आता समोर येईल शेकडो करोडांचा भ्रष्टाचार झालाय फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी आता आंदोलन करु काय होणार या सगळ्यांनी आता राजीनामा द्यावा मुलुंडच्या माणसाने ५० करोड खाल्ले आयएनएस विक्रांतची फाईल कोर्टाने पुन्हा ओपन केली गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे, तोंडावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे. अशी सडकुन टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR