मुंबई : प्रतिनिधी
मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार फोन करून आणि सोशल मीडियावर लज्जास्पद पोस्ट, कमेंट करण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्याकडून कारवाईची मागणी दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या बीडमध्ये सुरू असलेली गुंडशाही वारंवार समोर आणत आहेत.
परंतु, गेल्या चार दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचे सर्व पुरावे सादर केले आहेत. तर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार फोन करून आणि सोशल मीडियावर लज्जास्पद पोस्ट, कमेंट करण्यात येत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.