मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील ग्रँट रोड येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रँट रोड येथे म्हाडाच्या एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले होते. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
ग्रॅण्ड रोड स्थानकाबाहेर रुबिनिसा मंझील ही इमारत आहे. या इमारतीचा तिस-या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग सकाळी ११ वाजता कोसळल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत २० ते २२ नागरिक अडकले आहेत. नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत आहे. ही म्हाडाची इमारत आहे. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.