25.4 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमुख्य बातम्यामुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली!

मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालावल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालवला आहे. मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण दिसत आहे. यामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या मुंबईचा हवा निर्देशांक १०४ इतका नोंदविण्यात आला आहे. यामुळे आता मुंबई महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईचा हवा निर्देशांक १०४ इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे. काही भागात हवेचा निर्देशांक अतिवाईट स्थितीत नोंदविण्यात आला आहे. तर काही भागात वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, जुहू, महापे, नेरुळ या ठिकाणी हवेची गुणवत्ताही वाईट असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सातत्याने होणारे वातावरणातील बदल आणि बांधकामे यामुळे असंख्य मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत आहे.

मुंबईत वातावरणात घातक असलेल्या पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर देवनार, कुर्ला, कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका पुढील काही दिवस सातत्याने रस्त्यांवर पाणी फवारणी करत आहे. सध्या ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व २४ वार्डमध्ये ट्रक-माउंटेड फॉग मिस्ट कॅनन युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय १०० हून अधिक टँकर रस्त्यावर साफसफाईसाठी तैनात असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. विशेषत: बांधकाम पाडणे आणि उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणांवर मुंबई महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणा-या २८ बांधकाम साइट्स शोधून त्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR