20 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत बनावट गरबा पास बनविणारी टोळी गजाआड

मुंबईत बनावट गरबा पास बनविणारी टोळी गजाआड

६ जणांच्या टोळीला अटक ६०० बनावट पास जप्त

मुंबई : देशभरात नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळत असून सर्वत्र देवाची जागर सुरू आहे. मुंबई , पुण्यासह महानगरांमध्ये विविध मंडळे व क्लबच्या माध्यमातून गरबा आणि दांडिया खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. या खेळांच्या महोत्सवात कुणी बाहेरच्यांनी किंवा अज्ञातांनी सहभागी होऊ नये म्हणून शक्य ती खबरदारी घेतली जाते. त्यासाठी, तिकीट किंवा पासेस देऊनच एंट्री दिली जाते. मात्र, मुंबईतील काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या गरबा उत्सवात स्कॅम करुन पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी, बनावट पासेस तयार करुन विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेत गरबाचा बनावट पास बनवणारा सहा जणांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले सर्वजण कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांनी लाखो रुपये कमावण्याची योजना या माध्यमातून तयारी केली होती. मात्र, त्यांचा भांडोफोड झाला. बोरिवली पश्चिमेत रायगड प्रतिष्ठान आयोजित रंग रास या गरबा कार्यक्रमाचे ६०० बनावट सीझन पास बनविणा-या ६ जणांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे. अटक आरोपीचे नाव मनोज वेशी चावडा (वय १९ वर्ष),अंश हितेश नागर,(वय २० वर्ष), भव्य जितेंद्र मकवाना (वय १९ वर्ष), राज शैलेश मकवाना,(वय १९ वर्षे), यश राजू मेहता,(वय १९ वर्षे) आणि केयूर जगदीश नाई,(वय २० वर्ष) आहे. अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी १८ ते २० वर्षाच्या वयोगटातील असून हे सर्व कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत.

या सर्व आरोपींने नवरात्रीच्या काळात कमी दिवसात जास्त पैसे कमावण्याचे हेतूने ६०० गरबाचे बनावट पास बनवले, ज्याचा बाजारभाव ६ लाख रुपये एवढा आहे. बोगस गरबाचे पास बनवणारा या मुलांच्या टोळीचे सर्व साहित्य बोरिवली पोलिसांनी जप्त केली आहे. सोमवारी संध्याकाळी बोरिवली पश्चिमेत रंग रास गरबा खेळण्यासाठी दोन मुले बनावट गरबा पास घेऊन गेले होते.

सुरक्षा तपासणीवेळी प्रकार उघडकीस
सिक्युरिटी चेकिंग दरम्यान या पासवरचा बारकोड स्कॅन नं झाल्यामुळे सिक्युरिटीने या दोन्ही मुलांना पकडले. त्यानंतर सिक्युरिटीने दोन्ही मुलांना बोरिवली पोलिसांच्या स्वाधीन केले. बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बोगस गरबाचे पास बनवणा-या ६ जणांची टोळक्याला अटक केली. दरम्यान, अटक आरोपीने आणखी किती गरबाचे बोगस पास बनवले आहेत, किती लोकांना ते पास विकले आहेत, आणि यामध्ये आणखी काही सदस्य आहेत का? याच्या शोध बोरिवली पोलिसांकडून घेतला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR