मुंबई : प्रतिनिधी
पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढते. मुंबईतही साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत गेल्या दोन महिन्यांमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. स्वाईन फ्लू, कावीळ झालेल्या रुग्णांमध्ये तितकीशी वाढ झालेली नाही. गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या घटली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्याखालोखाल हिवताप आणि डेंग्यूचे प्रमाणही वाढत होते. जून व जुलैमध्ये हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले.
तसेच जुलैमध्ये स्वाईन फ्लूचेही काही रुग्ण आढळून आले. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याच्या घटना वाढल्या. या साठलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागल्याने लेप्टोचे रुग्णही वाढू लागले.