19.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeलातूरमुंबई घाटकोपर होर्डिंग्ज अपघातातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

मुंबई घाटकोपर होर्डिंग्ज अपघातातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

लातूर : प्रतिनिधी
मुंबई घाटकोपर होर्डिंग्ज कोसळल्यानंतर १७ जणांना आपला जिव गमवावा लागला. रचनेच्या मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेच्या रचनेचे हे होर्डिंग्ज घातक ठरल्यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्ज होत असुन लातूर येथे शहिद अहेमदखान पठाण कृती समितीच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठ गंजगोलाई येथे उभा असलेल्या एलईडी युनिपोल जवळ या घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
भौगोलिक दृष्ट्या पठारावर असलेल्या लातूरला वा-याचा वेग ताशी ७८ किलोमीटर इतका असतो, असा अंदाज आहे तर वादळीवा-यासह मुसळधार पाऊसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याकडून समजते. लातूर महानगरपालिकेने निविदा मागवून  होर्डिंग्ज व युनिपोलचा कोणताही कायदा नसताना निविदा भरल्या व शहरात १३ युनिपोल उभा केले.  हे युनिपोल लोखंड धातुपासुन बनवण्यात आले असुन प्रत्येकी एका युनिपोलचे वजन २ हजार किलो आहे. यांची रचना तोकड्या नटबोल्टवर करण्यात आली आहे तर जमिनीपासून ३० फुटापेक्षा जास्त उंच आहेत. वादळीवा-याचा वेग अनियंत्रित झाला तर हे युनिपोल उन्मळून पडु शकतात, असे मत शहिद अहेमदखान पठाण कृती समितीचे सर्फराज सय्यद यांनी सांगितले आहे.
शहरातील जवळपास सर्वच होर्डिंग अनधिकृत आहेत. होर्डिंग बसविताना मनमानी झाल्याचे निर्दशनास येते. मोठ मोठ्या आकाराचे होर्डिंगचे लोखंडी सांगाडे उंचच उंच इमारतींवर उभे करण्यात आलेले आहेत. वा-यामुळे होर्डिंगचे हे लोखंडी सांगाडे हेलकावे घात आहेत. त्याचे फाऊंडेशनही पक्के नाही. हे होर्डिंग कधीही कोसळू शकतात अशी परिस्थिी आहे. त्यामुळे या होर्डिंगसह घातक ठरु शकणारे युनिपोल तात्काळ हटवण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी उमेश कांबळे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सचिन गायकवाड, समितीचे सय्यद सर्फराज, इस्माईल शेख, तौसिफ शेख, सय्यद परवेझ, सय्यद सलीम, शादुल शेख, इजहार, साबेर, नोमान शेख, बिलाल शेख, सोहेल शेख, आदिल पठाण, अरबाज भाई यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR