22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeनांदेडमुखेडमधील सट्टा व्यापा-याची आत्महत्या

मुखेडमधील सट्टा व्यापा-याची आत्महत्या

नांदेड : गुजरातमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लिग क्रिकेट सामन्यांवर मुखेड येथे सट्टा घेणा-यांविरूद्ध स्थानिक गुन्हा शाखेने काल कारवाई केल्यानंतर यातील एका सट्टा व्यापा-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघड झाली. सत्तार शेख (वय ५०) असे त्या व्यापा-याचे नाव असून तो मुखेड येथील बालाजी मंदिर गल्लीमध्ये राहत असल्याची माहिती आहे. जुगारामध्ये झालेल्या नुकसानीमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा व अन्य सोपस्कार सुरू असल्याची माहिती आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR