21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आज सोलापूरचा दौरा करणार होते, मात्र त्यांनी प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून, आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पुढे ढकलली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची होती. मात्र ती बैठक रद्द करावी लागली आहे. मुख्यमंत्री शिंदे आज साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूरला जाणार होते.

वचनपूर्ती सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. पण त्यांची तब्येत बिघडल्याने आता हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR