23.3 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंनी शाळेत पहारा देत बसायचे का?

मुख्यमंत्री शिंदेंनी शाळेत पहारा देत बसायचे का?

बदलापूर प्रकरणावरून संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली

मुंबई : प्रतिनिधी
बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, म्हणून अख्खे बदलापूर रस्त्यावर उतरले होते. बदलापूर प्रकरणावरून सगळे आमदार थयथयाट करत होते. मात्र, मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सगळ्या शाळांत पहारा देणार का? असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
मात्र, बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर राज्यभरात ठिकठिकाणी तोंडाला काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून आंदोलन केले होते पण, विरोधकांवर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली आहे.

संजय गायकवाड म्हणाले, बदलापूर प्रकरणावरून सगळेजण थयथयाट करत होते. पण, ही एक प्रवृत्ती असते. असे नराधम वय न पाहता अत्याचार करतात. सगळे लोक सरकारने केले, असे म्हणत आहेत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रातील सगळ्या शाळेत पहारा देणार का? पोलिस अधीक्षक आरोपीच्या घरी जाऊन बसणार का? की आरोपी सांगणार मी बलात्कार करणार आहे, मला पकडायला या… संजय गायकवाड हे वादग्रस्त वक्तव्य, धमक्या देणे, मारहाण करणे, अशा प्रकरणांमुळे चर्चेत असतात. मात्र, बदलापूर प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधताना संजय गायकवाड यांनी हे अशोभनीय विधान केले आहे.
……

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR