लातूर : प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भोगाव धानोरा या लहानशा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील यशस्वी युवा उद्योजक मुरलीधर अप्पाराव गव्हाणे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात लातूरनगरीचे माजी महापौर ऍड. दीपक सूळ, महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, कवि राजेसाहेब कदम, इफ्तेखार पटेल, नागनाथ लोखंडे, राजेंद्र देशपांडे, काबीरसर, सुजल जहागिरदार आदी मान्यवरांच्या हस्ते मुरलीधर गव्हाणे यांना सपत्नीक उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्यकृतत्वाचा गौरव करण्यात आला. मुरलीधर गव्हाणे यांनी तब्बल १४ वर्षे परभणीच्या एका फायबर डोअर्स कंपनीमध्ये केले.
या अनुभवातून त्यांनी स्वतंत्र उद्योग सुरु करण्याचा निश्चय केला आणि २०१७ सालापासून वसमत परभणी रोडवर बळेगाव पाटीनजीक त्यांनी राजमाता जिजाऊ फायबर प्लस डोअर्स नावाने कंपनी सुरु केली. त्यांच्या या धडपडीची, जिद्दीची दखल घेवून महात्मा फुले शिक्षक परिषदेने त्यांना उद्योगरत्न पुरस्कार देवून मोठा गौरव केला आहे. तो आजच्या युवकांसाठी उर्जादायी, प्रेरणादायी असा आहे. त्यांच्या पुरस्काराबद्दल महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, माजी महापौर दीपक सूळ, राजेसाहेब कदम, संभाजी ब्रिगेडचे पिराजी गाडगे, भोगावचे सरपंच भिमराव कांबळे, अनिल कांबळे, सुदाम कदम, नागनाथ गव्हाणे, गोपीनाथ गाडगे, रामा घाटोळ, राजेंद्र गव्हाणे, बालाजी गव्हाणे, गंगाधर गव्हाणे, गोविंद गव्हाणे, अविनाश गाडगे, भागवत अवचार, रामभाऊ वावरे, कृष्णा वावरे, गोविद काशिनाथ गव्हाणे, धम्मपाल कांबळे आदींसह अनेकांनी उद्योगरत्न मुरलीधर गव्हाणे यांचे अभिनंदन केले आहे.