लातूर :प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा संकुलातील रंिनंग ट्रॅकच्या धर्तीवर मुरुड येथील तालुका क्रीडा संकुलमध्ये २०० मीटर रंिनंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. या ट्रॅकसह सुसज्ज मैदानाचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, जनतेने मला संधी दिल्यानंतर मतदारसंघातील अनेक विकासकामे मी हातावर घेतली. त्यापैकी हे एक होते. मुरुड येथील क्रीडा संकुलाच्या अखर्चित निधीतून कामे करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे या क्रीडा संकुलासाठी सादर केलेल्या ५ कोटीच्या प्रस्तावापैकी ३ कोटीचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे. यातून इनडोअर गेमसाठी मल्टीपर्पज हॉल व खेळाडूंसाठी अंतर्गत सुविधा तेथे निर्माण करू, असे ते म्हणाले.
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, दिलीप नाडे, बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता व्ही. वाय. आवाळे, शाखा अभियंता वैजनाथ खटाळ, सहाय्यक अभियंता अप्पासाहेब वाघमारे, रवींद्र काळे, सुभाष घोडके, राजाभाऊ गलांडे, भारत लाड, बी. एन. डोंगरे, बी. एस. पवार, राजेंद्र मस्के, ईश्वरप्रसाद चांडक, उद्धव सवासे, दीपक पठाडे, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, उपविभागीय अभियंता जगदीश कोकाटे, आकाश कणसे, डॉ. दिनेश नवगिरे, जीवन झोडगे, रामचंद्र जाधव, आनंद घाडगे, लक्ष्मीकांत तवले, सद्दाम तांबोळी, महेश भोसले, बालाजी मस्के आदी उपस्थित होते.