28.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमुस्लीम राष्ट्रांत बालविवाहात वाढ; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

मुस्लीम राष्ट्रांत बालविवाहात वाढ; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

 

संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था
मुस्लीम देशांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मिडील ईस्ट आणि उत्तर आफ्रिका भागात बालविवाह थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु हे प्रयत्न अपूर्ण पडत आहेत. कुवैतमध्ये नुकतेच लग्नाचे वय १८ करण्यात आले. त्यानंतरही समस्या गंभीर आहे. त्याला कारण कायदेशीर त्रुटी, सामाजिक प्रथा आणि गरीबी आहे. त्यामुळे लाखो मुलींना कमी वयात लग्न करावे लागत आहे.

अरब देशांमध्ये लग्नाचे कमीत कमी वय १८ वर्ष आहे. परंतु त्याला धार्मिक न्यायालयाच्या निर्णयांनी कमकुवत बनवले आहे. कुवैतमध्ये २०२४ मध्ये ११४५ अल्पवयीन मुलांचे लग्न करण्यात आले. त्यात १०७९ मुली आहेत तर ६६ मुले आहेत. इराकमध्ये नुकताच एक कायदा करण्यात आला. त्यानुसार ९ वर्षांच्या मुलांचे लग्न करण्यास संमती धार्मिक न्यायालये देऊ शकतात.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत, १८ वर्षाखालील ४० दशलक्ष मुली वधू आहेत. या युद्धग्रस्त भागात ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. येमेन, इराक, सीरिया, सुदान आणि गाझा पट्टीमध्ये आर्थिक संकट आणि सुरक्षेच्या कारणांमुळे कुटुंबे आपल्या मुलींची लवकर लग्ने लावत आहेत. गाझामध्ये संघर्षानंतर बालविवाह वाढत आहेत.

ऑक्सफॅम आणि युनिसेफनुसार, १५ ते १९ वर्षे वयोगटातील ७०% विवाहित मुली कोणत्या ना कोणत्या हिंसाचाराला बळी पडतात. कमी वयात गर्भधारणा झाल्यास गुंतागुंत आणि माता मृत्यूचे प्रमाण वाढते. तसेच लग्नानंतर मुलींचे शिक्षण खंडित होते. त्यामुळे त्यांच्या जीवनातील आर्थिक आणि सामाजिक संधी मर्यादित होतात. महिलांचे अधिकार कमी होतात. मागील काही वर्षांत महिला हक्क संघटनांनी केलेल्या सुधारणा धोक्यात आल्या आहेत. सुदान आणि अफगाणिस्तानमध्ये मुलींचे शिक्षण आणि अधिकार कमी झाल्यामुळे अल्पवयीन विवाहाच्या घटनांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR