23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमृत्यूनंतरही दिला जाऊ शकतो मुलाला जन्म!

मृत्यूनंतरही दिला जाऊ शकतो मुलाला जन्म!

दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली हायकोर्टाने सरोगसीबद्दल एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सर गंगाराम रुग्णालयात एका मृत व्यक्तीचे फ्रीज केलेले स्पर्म ठेवण्यात आले होते. दिल्ली हायकोर्टाने निर्णय देत सर गंगाराम रुग्णालयात मृत व्यक्तीचे फ्रीज केलेले स्पर्म सरोगसीच्या माध्यमातून मुल जन्माला घालण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की, जर स्पर्म किंवा ‘एग’च्या मालकाची परवानगी मिळाली तर त्याच्या मृत्यूनंतर देखील मुल जन्माला घालण्यास कोणतेही बंधन नाही.

जस्टिस प्रतिभा सिंह यांनी यासंबंधीचा निर्णय दिला. हा अशा प्रकारचा पहिलाच निर्णय आहे. सिंह यांनी सांगितले की, भारतीय कायद्याअंतर्गत जर स्पर्म किंवा ‘एग’ मालकाच्या सहमतीचे पुरावे सादर करण्यात आले तर त्याच्या मृत्यूनंतर देखील प्रजनन करण्यास कुठलेही बंधन घालण्यात आलेले नाही. त्यांनी पुढे सांगितले की, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यावर विचार करेल की मृत्यूनंतर प्रजननातून संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे की नाही.

इंदर सिंह यांचा १ डिसेंबर २०२० रोजी मृत्यू झाला. त्याच वर्षी २१ डिसेंबर रोजी त्यांचे आई-वडील गुरविंदर सिंह आणि हरबीर कौर यांनी रुग्णालयात सुरक्षित स्पर्म जारी करण्याची विनंती केली होती. जेव्हा त्यांना सॅम्पल मिळू शकले नाही तेव्हा त्यांनी २०२१ मध्ये दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. वरिष्ठ अधिवक्ता सुरूचि अग्रवाल आणि अधिवक्ता गुरमीत सिंह यांनी या दांपत्याची बाजू कोर्टासमोर मांडली.

जस्टिस सिंह यांच्या खंडपीठाने आई-वडिलांची याचिका स्वीकारत सांगितले की, प्रीत इंदर यांनी आपले स्पर्म संरक्षित करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की प्रजनन संरक्षणासाठी तयार होते. याचिकाकर्त्यांच्या मुलाचा उद्देश मुल जन्माला घालण्यासाठी स्पर्मचे सॅम्पल वापरणे हा होता. त्यामुळे कोर्टाने स्पष्ट केले की आई-वडीलांना आपल्या मुलाच्या अनुपस्थितीत नातवंडांना जन्म देण्याची संधी मिळू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR