पूर्णा : पावनमारी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत विद्या प्रसारिणी सभेची शाळा पुर्णा शाळेतील खेळाडुंनी यश संपादन केले. या मध्ये गौरी भोसले व स्नेहल शिंदे यांनी घवघवीत यश मिळवले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे, उपाध्यक्ष भिमराव कदम, सचिव श्रीनिवास काबरा, व्ही. जी. रुद्रवार, उत्तमराव कदम, साहेबराव कदम, काकडे, बी.बी मोरे, हरिभाऊ पाटील, मुख्याध्यापक डी एल उमाटे, श्रीमती अतिया, एस आर हिंगणे व सर्व शिक्षकवृन्द, परभणी जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संतोष एकलारे, उपाध्यक्ष सतिश टाकळकर, गोविंद गिराम, कैलास टेहरे, सतिश बरकुंटे, संतोष बहोत यांनी अभिनंदन केले. या खेळडूंना सज्जन जैस्वाल व प्रकाश रौंदळे यांनी मार्गदर्शन केले.