26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमोदींचे ४०० पारचे स्वप्न अल्पसंख्याकांनी मिळविले धुळीस; शरद पवार

मोदींचे ४०० पारचे स्वप्न अल्पसंख्याकांनी मिळविले धुळीस; शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अल्पसंख्याकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४०० पारपासून दूर ठेवले. एक हाती सत्ता हाच ४०० पारचा एकच उद्देश होता. पण देशातील अल्पसंख्याकांनी असे होऊ दिले नाही. अशी टीका पवार यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या अल्पसंख्याक विभागाने राष्ट्रीय कार्यकारणी बैठक आणि कार्यकर्ता संमेलन मुंबईत झाले. या कार्यक्रमात त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. विधानसभा निवडणुकीत सत्ताधा-यांना सत्तेतून खेचण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एक मंत्र दिला.

वक्फ बोर्डानुसार, अल्पसंख्यांकांना जे अधिकार देण्यात आले आहेत, ते संपवण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे. वक्फ मालमत्तेचे काय करायचे, त्याचा कोणत्या कामासाठी वापर करायचा, हा अधिकार अल्पसंख्याकांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून सत्ता खेचण्यासाठी २ जागा कमी मिळाल्या तरी हरकत नाही, पण आम्ही जादा जागा मागणार नाहीत. गेल्या १० वर्षांपासून देशाची सत्ता चुकीच्या हातात आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचा विश्वास संपादन करणे हे सत्ताधा-यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा देश सर्वांचाच आहे. ज्यांच्यावर असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकसभा निवडणुकीत देशातील पंतप्रधान ४०० पारचा नारा देत होते. कशाला हव्या होत्या त्यांना इतक्या जागा? ४०० पारचा नारा हा देशाच्या हितासाठी नव्हता. तर एका व्यक्तीच्या हातात अधिकार यावेत यासाठी होता. याविषयीची भीती वेळीच ओळखल्यानंतर ४०० पार ना-याचे स्वप्न भंगले. देशातील जनता सामाजिक ऐक्य बंधुता हवी आहे. शांतता हवी आहे. ४०० पारचा आकडा ओलांडल्यानंतर यात अडथळा निर्माण होऊ शकला असता.

सरकारला भ्रष्टाचाराची लागण
नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्धघाटनावेळी अशा लोकांन बोलवण्यात आले, ज्याचे या प्रक्रियेशी काहीही देणे घेणे नव्हते. त्यावेळी संसदेच्या सदस्यांना बोलवण्यात आले नाही. नवीन संसद, आयोध्येतील राम मंदिराला गळती लागली आहे. सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. या सर्व गोष्टीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR