23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरमोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे धरणे

मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे धरणे

मोहोळ: अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्दच्या मागणीसाठी आजी- माजी आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

सदरचे कार्यालय प्रशासनाने तत्काळ रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दीपक गायकवाड, चरणराज चवरे, उमेश पाटील, मानाजी माने, बाळासाहेब गायकवाड, दादासाहेब पवार, काका देशमुख, संजय क्षीरसागर, सत्यवान देशमुख, अ‍ॅड. विनोद कांबळे, बाबासाहेब पवार, सुशील क्षीरसागर, राजू रसाळ, महेश देशमुख रमेश माने, सुनील चव्हाण, अशोक भोसले, विक्रम देशमुख, बिलाल शेख, संतोष सोलनकर, गणेश गावडे, विजय गायकवाड, शांतीकुमार अष्टूळ,सोमनाथ पवार, सुलेमान इनामदार,
दिपक गवळी, राजु गुंड, नागेश खिलारे आदींसह मोहोळ शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले. अनगर येथे मंजूर असलेले अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या योग्य नसून मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी हे गैरसोयीचे असल्याबद्दल या भागातील जनतेत नाराजी असल्याचे पत्रात नमूद आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR