मोहोळ-
मोहोळ नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश डोके यांचा पुन्हा नाकर्तेपणा सिद्ध झाला आहे. मोहोळ शहरातील धनगर गल्ली, तांबडी माती, नागनाथ मंदिर परिसरातील महिलांचा घागर मोर्चा मोहोळ नगरपरिषदेवर नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
गेल्या सात ते आठ महिन्यापासून वार्ड क्रमांक चार मध्ये आणि तेथील अनेक भागामध्ये पाणी मिळाले नसल्याने अनेक महिलांनी संताप व्यक्त केला आहे. लाईट, पाणी, गटारी अशा सुविधा नसताना कर मात्र मोठ्या प्रमाणात वसुल केला जात आहे.
असा हा जुलमी कर नगरपरिषद वसूल करत असल्याचे मत बारसकर यांनी व्यक्त केले. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे मोहोळच्या जनतेला नाहक त्रासाला सामोरे जाव लागत आहे.
नगर परिषदेच्या प्रशासनाने येत्या दोन दिवसात जर पाणी सोडण्याची सोय नाही केली तर हजारो महिला नगरपरिषदेवर यापेक्षाही मोठा मोर्चा काढणार आहे. मुख्याधिकारी डोके, पाणी पुरवठा अधिकारी लोमटे यांच्या काम बिदल तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासक योगेश डोकेचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, अशा विविध घोषणा देत मटकी फोडून निषेध व्यक्त केला.
यावेळी बारसकर म्हणाले, नगर परिषदेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले मुख्याधिकारी डोके हे फक्त ठेकेदार यांच्याच विळख्यात व्यस्त असतात. संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. अधिकाऱ्यांना मोहोळ शहराचा पाणी प्रश्न व मुलभूत नागरी समस्या भेडसावत असून हे मुलभूत समस्या सोडविण्यास अपयशी ठरत आहेत.