22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमुख्य बातम्याम्यानमारमध्ये पेटले गृहयुद्ध; २६ लाख लोक विस्थापित

म्यानमारमध्ये पेटले गृहयुद्ध; २६ लाख लोक विस्थापित

रंगून : वृत्तसंस्था
म्यानमारमध्ये गृहयुद्धाला तोंड फुटले असून सैन्याला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. आता बंडखोरांनी चीन सीमेला लागून असलेल्या एका मुख्य सैनिकी तळावर कब्जा केल्याचे वृत्त आहे. हा म्यानमार सैन्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे. या गृहयुद्धात २६ लाख लोक विस्थापित झाले आहेत.

यासंदर्भात बोलताना, सरकारी सैन्यासोबत २३ दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे.

बंडखोरांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या सैनिकांनी विजय मिळवला असून शत्रू सैनिकांना हटवले जात आहे. निवेदनात म्हणण्यात आले आहे की, स्थानिक लोकांनी शांतता पाळावी आणि नियमांचे पालन करावे. महत्वाचे म्हणजे, न्यूज पोर्टल ‘म्यानमार नाऊ’ने म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने लॅशियोमध्ये कब्जा केल्याची पुष्टी केली आहे.

म्यानमारमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गृहयुद्ध सुरू आहे. म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी एका अशा अल्पसंख्याक बंडखोर गटांपैकी आहे, जो म्यानमारच्या सैनिकांना, ते आपला प्रदेश समजत असलेल्या भूभागातून बाहेर काढण्यासाठी लढत आहे.

संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, या गृहयुद्धात म्यानमारचे अनेक लोक मारले गेले आहेत, तसेच २६ लाखाहून अधिक लोक विस्थापितही झाले आहेत.

पराभव स्वीकारण्यास सैनिकांचा नकार
खरे तर म्यानमारमधील ही लढाई २०२१ पासूनच सुरू झाली. येथील हंगामी लोकशाहीनंतर म्यानमारचे सैन्य २०२१ मध्ये पुन्हा सत्तेवर आले. आता हे युद्ध संपूर्ण देशालाच उद्ध्वस्त करत आहे. मात्र म्यानमार सैनिक पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. महत्वाचे म्हणजे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यात हस्तक्षेप केला, मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR