26.9 C
Latur
Saturday, June 15, 2024
Homeमहाराष्ट्रयवतमाळमध्ये अन्नातून १९ जणांना विषबाधा

यवतमाळमध्ये अन्नातून १९ जणांना विषबाधा

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे एका धार्मिक कार्यक्रमात १९ जणांना शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. रुग्णांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल केले असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मे महिन्यात देवपूजेच्या कार्यक्रमात बोकडाचा बळी देण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे आणि या ठिकाणी गाव जेवण देण्यात येते. पूर्वापार पासून सुरू असलेल्या प्रथेनुसार म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बोकडाचा बळी देण्यात आला. पण तेच बोकडाचे मटण काहींनी बुधवारी सकाळी खाल्ले.

अशातच मंगळवारी रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने काहींना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. या सर्वाना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. घटनेचे गांभीर्य ओळखता डॉक्टरांनी या सर्व रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू केले. या १९ रूग्णांपैकी १६ जणांची प्रकृती स्थिर आहे तर तीन चिमुकल्यांनी प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR