22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरयावर्षी पहिलीच्या वर्गाचे प्रवेश घटणार

यावर्षी पहिलीच्या वर्गाचे प्रवेश घटणार

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात यावर्षी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचा शाळा स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सर्व्हे केला आहे. त्यामुळे यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लातूर जिल्हयात येत्या १५ जून पासून सर्व माध्यमाच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी जिल्हाभरात सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेवरून या वर्षी १५ हजार ४१५ बालकांचा इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश होणार आसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. यात ७ हजार ७९१ मुले, ७ हजार ६२४ मुलींचा समावेश आहे. लातूर जिल्हयात गेल्यावर्षी इयत्ता पहिलीच्या वर्गात १९ हजार ३९ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला होता. यावर्षीचे संभाव्य होणारे प्रवेश पाहता इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घटणार असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.

लातूर जिल्हयात जिल्हा परिषद, मनपा, नपा, खाजगी शाळा, सर्व माध्यमाच्या येत्या १५ जून पासून सुरू होणार आहेत. शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी शिक्षकांची घडपड दिसून येत आहे. तसेच आरटीई अंतर्गत इयत्ता १ ली च्या वर्गासाठी प्रवेश घेण्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ४ जून ही उद्याच्या दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे इतर जिल्हयातून लातूर येथे कांही काळापुरते रहिवाशी झालेल्या पालकांच्या पाल्यांचे प्रवेश वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR