27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeक्रीडायुवा टीम इंडियाला पराभवाचा धक्का, झिम्बॉब्वे विजयी

युवा टीम इंडियाला पराभवाचा धक्का, झिम्बॉब्वे विजयी

हरारे : वृत्तसंस्था
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पहिला टी-२० सामना रोमहर्षक झाला. झिम्बॉब्वेने विश्वविजेत्या भारताला १३ धावांनी पराभूत केले. पाच सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात झाली. झिम्बॉब्वेने भारतापुढे विजयसाठी ११६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. टी-२० वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली मॅच खेळत होता. मुझरबनी आणि चटाराने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला १३ धावांनी पराभूत केले.

वॉशिंग्टनने सुंदरने २७ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. झिम्बॉब्वेविरुद्ध शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर शिवाय इतर फलंदाज चांगली खेळी करण्यात अपयश आलं. भारतीय संघ १०२ धावांवर बाद झाला. झिम्बॉब्वेने भारतापुढे विजयासाठी ११६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला. यानंतर अनुभवी खेळाडू ऋतुुराज गायकवाडदेखील लवकर बाद झाला. ऋतुराज गायकवाडने केवळ ७ धावा केल्या. आज पदार्पण करणा-या रियान परागला मोठी खेळी करण्यात अपयश आले. परागला चटाराने २ धावांवर असताना बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या अनुभवी खेळाडू रिंकू सिंगने मोठी निराशा केली. तो शुन्यावर बाद झाला. ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल डाव सावरतील, असे वाटत असतानाच ध्रुव जुरेल ६ धावा करुन बाद झाला. यानंतर कॅप्टन शुभमन गिल ३१ धावांवर बाद झाला. शुभमन गिलला झिम्बॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाने बाद केले. सिकंदर रझाने भारताच्या तीन विकेट घेतल्या. शुभमन गिल बाद झाला तेव्हा भारताच्या ४७ धावांवर सहावी विकेट गेली होती. यानंतर वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई आणि आवेश खानने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना विजय साकारता आला नाही. झिम्बॉब्वेच्या सिकंदर रझा, तेंदाई चटारा, ब्रायन बेनेट्ट, वेलिंग्टन मस्कदझा, ब्लेसिंग मुझरबनी, ल्यूक जोंगवे यांनी भारताच्या फलंदाजांना रोखले. सिकंदर रझाने तीन तर चटाराने २ विकेट घेतल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR