22.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्ररवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष

रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.
पूर्वीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. आता त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांच्यावर कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावनकुळे आहेत.
रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते २००९ पासून सलग ४ वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निडवणुकीत त्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रि­पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने २००२ साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. २००५ साली त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणू्न प्रवेश मिळवला होता. २००७ मध्ये ते स्थायी समिती सभापती झाले होते. २००९ साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR