मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. दरम्यान २० जानेवारी रोजी ‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलचा मोशन पोस्टर शेअर करण्यात आला होता. आज २१ जानेवारी रोजी, या चित्रपटातील साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
‘छावा’ चित्रपटाचे निर्माते मडोक फिल्म्स यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रश्मिका मंदानाचे फर्स्ट लूक पोस्टर्स शेअर केले आहे. मडोक फिल्म्सने दोन पोस्टर्स रिलीज केले आहेत, ज्यामध्ये रश्मिका ‘येसूबाई भोसले’ यांच्या भूमिकेत दिसत आहे.
चित्रपटात रश्मिका मंदाना (छत्रपती संभाजी महाराज) विकी कौशलच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल संभाजी महाराजांचे पात्र साकारणार आहे. तसेच रश्मिकाच्या पोस्टरमधील लूकबद्दल बोलायचं झालं तर, यात ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये असल्याची दिसत आहे. पहिल्या पोस्टरमध्ये रश्मिका मंदाना मराठी पारंपरिक साडी आणि दागिन्यांमध्ये हसताना दिसत आहे.
दुस-या पोस्टरमध्ये, रश्मिका ही नाराज आणि चिंतेत असल्याची दिसत आहे. चित्रपटातील रश्मिकाचे पोस्टर्स शेअर करताना निर्मात्यांनी यावर लिहिलं की, ‘प्रत्येक महान राजाच्या मागे एका शक्तिशाली राणीची ताकद असते. स्वराज्याची शान असलेल्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदानाला सादर करत आहोत.’