अक्कलकोट- रहबर फाऊंडेशनच्या अनावरणाच्या निमित्ताने अक्कलकोट येथील लोकापूरे मल्टीपर्पज हॉलमध्ये “योमे-ए-गालीब” आणि “उर्दू दिन” मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाशा कोरबू होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल, माजी प्राचार्य एम. ए.शेख, ॲड.शरद फुटाणे, माजी नगराध्यक्ष अशपाक बळोरगी, माजी प्राचार्य हाजी अरिफपाशा पिरजादे, माजी प्राचार्य हाजी हसन बाशा शिक्कलगर, सद्दाम शेरीकर, मुख्याध्यापिका नसरीन होटगीकर, मुख्याध्यापक खालीद खान, माजी प्राचार्य अजीज शेख, प्राचार्य सुरेंद्र कंचार, चेतन जाधव, अंकुश इंगळे, इकबाल बागमारू, फारुख शेख हे उपस्थित होते.
यावेळी मेहमूद नवाज जहागीरदार यांनी रहबर फाऊंडेशनचे कौतुक करताना उर्दू भाषा आणि उर्दू शिक्षणावर विचार मांडले. त्यांनी रहबर फाऊंडेशनच्या कार्याबद्दल प्रशंसा केली आणि पुढील काळात उर्दूचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
रहबर फाऊंडेशनच्या अध्यक्षा हिना बागमारू (शेख) यांनी आपल्या प्रस्तावनेत भविष्यात करिअर गाईडन्स, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा, तसेच मुस्लीम समाजातील मुलींच्या शैक्षणिक गळतीला रोखण्यासाठी विशेष काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात अक्कलकोट नगर परिषद उर्दू शाळा आणि अँग्लो उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील शैक्षणिक आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित नाटक, काव्य संमेलन आणि वक्तृत्व स्पर्धा सादर केली. विजेत्या विद्यार्थ्यांचा रहबर फाऊंडेशनकडून ट्रॉफी आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून शम्स सय्यद (बागमारू) आणि हाजी अल्लाबक्ष अब्दुल रहेमान हवरे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा हिना बागमारू (शेख), सहसचिव साजेदा बेगम मुजावर, खजिनदार तबस्मुम रफिक शेख, उपाध्यक्ष मौलाअली महमंद शरीफ बागवान, सचिव अयुब मुस्तफा गवंडी आणि इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीज शेख यांनी केले आणि आभार साजेदा मुजावर यांनी व्यक्त केले.