21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रराजगुरुनगरमध्ये वेटरने केला दोघी बहिणींचा खून

राजगुरुनगरमध्ये वेटरने केला दोघी बहिणींचा खून

राजगुरुनगर: दोन लहान मुलीचे खून करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरल मध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी (दि २६) उघडकीस आला. कार्तिकी सुनिल मकवाने , वय ९ वर्ष व दुर्वा सुनिल मकवाने, वय ८ वर्ष अशी मुलींची नावे आहेत.

नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत. त्या लगत असलेल्या एका बियर बार मध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळुन आले असल्याचे बोलले जात आहे. या मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला. मात्र मिळुन न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेडपोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती. दोघी सख्या बहिणी असुन बाहेर गावाहून मोलमजुरी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजते.

हरवलेल्या मुलींचा तपास करताना खब-या मार्फत माहिती मिळाली. त्यानुसार खेड पोलीसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या बारमध्ये काम करणा-या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघा भर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळुन आल्या असे सांगण्यात आले. दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदणासाठी नेण्यात आले आहेत. हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळुन आल्या आहेत. सखोल चौकशी सुरू आहे. असे पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.

त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले. खेड तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जवळपास ५० वर्षांचा आरोपी असुन अघोरी कृत्य करणा-या आरोपीला पोलीसांनी पहाटे चारच्या सुमारास पूण्यातील एका लॉज वरून अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तपास सुरु आसल्याने खून का करण्यात आला याची अजून कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. मात्र काही तासातच पुणे क्राईम ब्रांच पुणे व खेड पोलीसांकडून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे. मुलींच्या आईचे व वेटरचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यातुन वेटर ने हा अघोरी प्रकार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मयत मुलीचे वडील राजगुरुनगर लगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी असुन पत्नी मोलमजुरी करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR