18.3 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeलातूरराजर्षी शाहू महाविद्यालयास ‘नॅक’ चा अ+ दर्जा

राजर्षी शाहू महाविद्यालयास ‘नॅक’ चा अ+ दर्जा

लातूर : प्रतिनिधी
शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेने (नॅक) ३.४९ सीजीपीएसह ‘अ+’ दर्जा बहाल केला आहे. नॅक मूल्यांकनाची ही चौथी सायकल होती. यात उच्च श्रेणीची गुणवृत्ता महाविद्यालयाने प्राप्त केली आहे. ४.०० स्­केल पैकी ३.४९ सीजीपीएसह उच्च श्रेणी प्राप्त करणारे, स्वायत्ततेची जबाबदारी स्वीकारलेल्या महाराष्ट्रातील एकूण महाविद्यालयात शाहू महाविद्यालय हे केवळ दुस-या क्रमांकाचे तर मराठवाड्यातील महाविद्यालयात पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर्वाधिक सीजीपीएस प्राप्­त करणारे ठरले असून यामुळे ‘लातूर पॅटर्न’ च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.   संस्थात्मक मूल्य व नाविण्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून ‘नॅक’ समितीने हा दर्जा बहाल केला आहे. यापूर्वीच स्वारातीम विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात शाहू महाविद्यालयास १०० पैकी ९९.४६ गुण मिळाले आहेत.
महाविद्यालयाच्या यशात शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ श्.िांदे, सहसचिव अ‍ॅड. सुनील सोनवणे, संस्­थेचे सर्व  सदस्­य यांचे कायमच मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन राहिलेले आहे.  प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे,  डॉ. अभिजीत यादव, सर्व क्रायटेरिया चेअरमन, वेबसाईट समिती प्रमुख व सहाय्यक विद्यार्थी, सपोर्ट युनिटचे प्रभारी प्राध्­यापक, सर्व विभागप्रमुख, नॅक पूर्वतयारीच्या विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, सर्व विद्यार्थी यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR