27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीराज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा गुरूवारी परभणी जिल्हा दौरा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा गुरूवारी परभणी जिल्हा दौरा

परभणी : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे गुरुवार, दि.१० ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. या दौ-यात ते विविध क्षेत्रातील तंज्ञासमवेत संवाद साधणार आहेत.

त्यांच्या दौ-याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. दि.१० ऑक्टोबर रोजी दुपारी २.३५ वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने परभणी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आगमन होईल.

त्यानंतर दुपारी २.४० वाजता पोलिस मुख्यालय येथून शासकीय विश्रामगृह परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी २.५० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर राखीव वेळ असणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत शासकीय विश्रामगृह परभणी येथे विविध क्षेत्रातील तज्ञांसमवेत संवाद साधणार आहेत.

रात्री शासकीय विश्रामगृह परभणी येथे मुक्काम. दुसरे दिवशी शुक्रवार, दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडकडे प्रयाण करतील. सकाळी ९.२५ वाजता पोलिस मुख्यालय मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता हेलिकॉप्टरने यवतमाळकडे ते प्रयाण करतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR