निलंगा : प्रतिनिधी
कर्मयोगी स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल मराठी राजभाषा दिनाचे औचित साधून जाहीर करण्यात आला. कर्मयोगी स्व. डॉ. निलंगेकर व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मोहन नटवे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. भागवत पौळ , प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, उप मुख्याध्यापक पवार हे उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
निबंध स्पर्धेचा निकाल शरद सोळुंके यांनी जाहीर केला यात कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक रोख २५५१ रु. स्मृतीचिन्ह, प्रमाण पत्र, मगर विमल नरंिसग, द्वितीय (विभागुन) क्रमांक रोख २०५१ रु. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, कु.वैशाली संतोष खाडे पुणे, सोळंके अवंती प्रल्हाद निलंगा तृतीय (विभागून) क्रमांक रोख १५५१ रु स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, गौंडगावे राखी नरंिसंग, सोळुंके सरस्वती सुदर्शन उत्तेजनार्थ स्मृतीचिन्ह व प्रमाण पत्र, विभुते अदिती बळीराम, क्षीरसागर प्रथमेश भरत जाधव भक्ती तानाजी तर वरिष्ठ गटातून प्रथम (विभागून) रोख ५००१ रु. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, कुलकर्णी शैला संजय- लातूर, नागसेन जगन्नाथ अंभोरे अकोला, द्वितीय (विभागून) रोख ३००१ रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, कांबळे राजकुमार यशवंत- औसा, मिरगाळे श्वेता अशोक- निलंगा, तृतीय (विभागून) रोख २००१ रु स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,सोमनाथ भाऊसाहेब ढोकणे-छ.संभाजीनगर, सिध्दलींग तुकारामचिंचोलीकर, उत्तेजनार्थ-स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र संजय जेवरीकर- निलंगा ही बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. भागवत पौळ यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा या निबंध स्पर्धेचे
मुख्य संयोजक मोहन नटवे यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला आणि सर्व स्पर्धकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. बी. एस. गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचलन ए. एम. पाटील तर आभार जगताप यांनी मानले. ही निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शरद सोळंके, संभाजी पालमपल्ले, थोरमोटे, सौ. जन्मले, जगताप , अरुण पाटील, सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.