उदगीर : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर तालुका क्रीडा संकुल, उदगीर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी फायनल मुली. मुलांच्या गटामध्ये पुणे विभाग अव्वल ठरला. मुले मुली या दोन्ही गटात प्रथम क्रमांक पुणे विभागाने पटकाविला आहे.
उदगीर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत,उदगीर नगर पालीकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रमण रेड्डी, डॉ.आशीष पाटील, डॉ.डांगे, माजी नगरसेवक, फैयाझ शेख, अहमद सरवर, अहमद रफेदार, सलीम परकोटे, परवेज कादरी, यावेळी तालुका क्रीडाधिकारी सुरेंद्र कराड, सारिका काळे, क्रीडाधिकारी कृष्णा केंद्रे, राज्य क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे, चंद्रकांत लोदगेकर, अभिजीत मोरे, अमर मगर, स्वप्नील मुळे आदी उपस्थित होते.