लातूर : प्रतिनिधी
पुणे जिल्हातील फायटर्स तायक्वांदो अॅकडमीच्या वतीने शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे दि. १८ ते २० जानेवारीदरम्यान पार पडलेल्या ३३ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील माहिरा इसरार सगरे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर आरोही मंचक राऊतराव हिने रजत तर आदित्य शर्मा व आयान असिफ पठाण यांना कास्य पदक प्राप्त झाले आहे.
सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा या ११ वर्षाखालील वयोगटात पार पडल्या. सुवर्ण पदक विजेती माहिरा इसरार सगरे हि राजा नारायनलाल लाहोटी शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी आहे. खेळातील चुणुक तीने पहिल्याच स्पर्धेत दाखवली आहे. या स्पर्धेतील रजत पदक विजेती आरोही राऊतराव हि केशवराज विद्यालयात शिकत असुन तिचेही उत्कृष्ट प्रदर्शन होते. कास्य पदकाचे मानकरी ठरलेले आदित्य शर्मा व आयान खान हे बंकटलाल लाहोटी शाळेतील खेळाडु आहेत.
विजेत्या खेळाडुंचे मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी, मुख्याध्यापक प्रधांत बुक्कावार, उप मुख्याध्यापक वैभव पोतदार, प्रविण शिवणगिकर, मुख्याध्यापक कुलकर्णी, प्रयागराज गरुड, सुनिल मुनाळे, गणेश इगवे, जहांगीर शेख,पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, आशोक घारगे, पोलीस उप निरीक्षक अनिल कांबळे, अमर केंद्रे यांच्यासह तायक्वांदो जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.