24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरराज्यातील प्रथम गणेशोत्सव मंडळास पाच लाखांचे पारितोषिक 

राज्यातील प्रथम गणेशोत्सव मंडळास पाच लाखांचे पारितोषिक 

लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्­कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याबाबत ३१ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ७ सप्टेंबरपासून सुरु होणा-या गणेशोत्­सवात राज्­यातील उत्­कृष्ट गणेशोत्­सव मंडळांना राज्­य शासनाकडून पुरस्­कार देण्­यात येणार आहे. यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील प्रथम गणेश मंडळास पाच लाख रुपयांचे पारितोषीक दिले जाणार आहे.
या स्­पर्धेत धर्मादाय आयुक्­त  यांच्­याकडे नोंदणी केलेल्­या किंवा स्­थानिक पोलीस स्­टेशन यांची किंवा स्­थानिक स्­वराज्­य संस्­था यांची परवानगी घेतलेल्­या सार्वजनिक गणेशोत्­सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. राज्­यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणा-या गणेशोत्­सव मंडळाना अनुक्रमे ५ लाख रुपये, २ लाख ५० हजार रुपये आणि १ लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्­यात येणार आहे.
तसेच राज्­य समितीकडे ३६ जिल्­ह्यातील प्रत्येकी १ याप्रमाणे ३६ प्राप्­त शिफारसीत गणेशोत्­सव मंडळापैकी ३ विजेते गणेशोत्­सव मंडळ वगळून उर्वरित ३३ गणेशोत्­सव  मंडळांचाही राज्­य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्­यात येणार आहे. प्रत्­येक जिल्­ह्यातील गणेशोत्­सव मंडळाची निवड करण्­यासाठी जिल्­हास्­तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेची माहिती आणि अर्ज करण्यासाठी ँ३३स्र://स्र’ीि२ँस्रंल्लीि‘ं’ंंूंीिे८.ङ्म१ॅ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR