15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील महिलांना दरमहा ३ हजार रुपये देणार

राज्यातील महिलांना दरमहा ३ हजार रुपये देणार

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. जवळपास सर्वच पक्षांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेतेमंडळींकडून विविध आश्वासनंही दिली जात आहेत. त्यातच पक्षांकडून जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येत आहेत. असे असताना आज महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये राज्यातील महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा ३ हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले.

काँग्रेसकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत. असे असताना महाविकास आघाडीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण आश्वासनं देण्यात आली आहेत. त्यामध्ये महिलांना बसप्रवास मोफत असणार आहे. नियमित कर्जफेड करणा-यांना ५० टक्क्यांपर्यंत माफी दिली जाणार आहे.

याशिवाय, जातनिहाय जनगणनाही केली जाणार आहे. कारण, याच्या माध्यमातून सवलती देणं सोपं होणार आहे. महालक्ष्मी योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा ३ हजार रुपये देणार आहेत. शेतक-यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफीही दिली जाणार आहे. दरम्यान, समाजात फूट पाडण्याचा आमचा उद्देश नाही तर समाजाचा विकास करण्याचा असल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.

राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत नाही
राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, असे यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ‘ग्रँड हयात’मध्ये महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR