24.3 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातून थंडी गायब!

राज्यातून थंडी गायब!

पुण्यात किमान तापमान १९ अंशांवर

पुणे : प्रतिनिधी
राज्यातून गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. आता अरबी समु्द्रात तयार होत असलेल्या चक्राकार वा-यांमुळे आर्दता वाढली आहे. परिणामी राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान हळूहळू २-३ अंशांनी वाढणार आहे. इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान थंडीचा जोर कमी झाला असून तापमान वाढलंय. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली असून पुण्यात १७ ते २० अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये १६.४, कोल्हापूर १७.७ अंशांची नोंद झाली.

नगरमध्ये १८ अंश सेल्सियस तापमान सोलापूरात २२ अंश एवढं तापमान होतं. मराठवाड्यात बीड, लातूरमध्ये २० अंश सेल्सियसची नोंद झाली.छत्रपती संभाजीनगरमये १८.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. हिंगोलीत गारठा वाढलेला होता. तिथे १६.५ अंश सेल्सियस तापमान होते.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वा-यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वा-याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या ४-५ दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या २४ तासांत किमान तापमानात हळूहळू २-४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR