21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्याराज्यात एकूण ९ कोटी ३६ लाख ७५ हजार ९३४ मतदार

राज्यात एकूण ९ कोटी ३६ लाख ७५ हजार ९३४ मतदार

मतदार नोंदणीत तब्बल १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची वाढ

मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार नोंदणीत तब्बल १६ लाख ९८ हजार ३६८ मतदार वाढल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच निवडणूक आयोगाने याबद्दलची आकडेवारी जाहीर केली आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदार यादीमध्ये राज्यात एकूण ९ कोटी ३६ लाख ७५ हजार ९३४ इतके मतदार होते. पण, मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात २० लाख ७८ हजार ०८१ नव्या मतदारांचे अर्ज आले. यात ८ लाख ८० हजार ६७६ पुरूष मतदार तर ११ लाख ९७ हजार २४० महिला मतदारांचा समावेश होता.

पण त्यातील काही हरकतीनंतर ३ लाख ७९ हजार ७१३ अर्ज वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता मतदार यादीत १६ लाख ९८ हजार ३६८ नव्या मतदारांची भर पडली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत महाराष्ट्रात मतदारांची संख्या ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ इतकी झाली आहे. यात ४ कोटी ९३ लाख ३३ हजार ९९६ पुरूष तर ४ कोटी ६० लाख ३४ हजार ३६२ महिला मतदार आहेत. तर ५ हजार ९४४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार : या मतदारांच्या वाढत्या संख्येत पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार आहेत. तर मुंबई उपनगरमध्ये ७५ लाख ८२ हजार ८६६ आणि ठाणे जिल्ह्यात ७० लाख ७ हजार ६०६ मतदार आहेत.

तसेच यात १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या १८ लाख ६७ हजार इतकी आहे. तर २० ते २९ वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या १ कोटी ८१ कोटी इतकी आहे. त्यासोबत २१ हजार ५५८ दिव्यांग मतदार आहेत. तर नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.

सर्वाधिक मतदार असलेले इतर जिल्हे

नाशिक : ४९ लाख ८२ हजार ४९०
नागपूर : ४४ लाख ३५ हजार ५५३
सोलापूर : ३७ लाख ६३ हजार ७८९
अहमदनगर : ३७ लाख २७ हजार ७९९
जळगाव : ३६ लाख १६ हजार ४०३
कोल्हापूर : ३२ लाख ५१ हजार १९२
संभाजीनगर : ३१ लाख ४५ हजार २०३

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR