21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मुस्लिम उमेदवारांचे प्रतिनिधित्व अत्यल्प

राज्यात मुस्लिम उमेदवारांचे प्रतिनिधित्व अत्यल्प

निवडणूक विभागाकडून आकडेवारी समोर

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. देशभरातील विविध पक्षांतील स्टार प्रचारक आपापल्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेत आहेत. अशात बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है अशा घोषणांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यादरम्यान आता राज्य निवडणूक विभागाकडून मुस्लिम उमेदवारांची आकडेवारी समोर आली आहे.

निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार, उमेदवारांमध्ये मुस्लिम उमेदवारांचे प्रतिनिधित्व खूपच कमी असल्याचे आकडेवारीत समोर आले आहे. एकूण उमेदवारांच्या आकड्यांनुसार, ही टक्केवारी केवळ १० टक्के आहे. २८८ मतदारसंघांत एकूण ४१३६ उमेदवार आहेत. त्यापैकी ४२० मुस्लिम उमेदवार आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक उमेदवार अपक्ष आहेत.

राज्यातील प्रमुख पक्षांनी अपेक्षेहून कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसने केवळ ९ मुस्लिम उमेदवार दिले आहेत. तर भाजपकडून एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकिट देण्यात आलेले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने पाच जणांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

सर्वाधिक मुस्लिम उमेदवार ओवेसींचे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने सर्वाधिक १६ मुस्लिम उमेदवारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर लहान पक्षांनी १५० उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. ४२० मुस्लिम उमेदवारांपैकी २१८ उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत.
राज्य निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार, १५० हून अधिक मतदारसंघांत एकही मुसलमान उमेदवार देण्यात आलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR