27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात सध्या फिरतेय ‘गुलाबी गँग’

राज्यात सध्या फिरतेय ‘गुलाबी गँग’

पुणे : प्रतिनिधी
सध्या अजित पवार यांनी सुरू केलेल्या जन सन्मान यात्रा व यामध्ये वापरण्यात येत असलेल्या गुलाबी रंगाचा धागा पकडत राज्यात सध्या गुलाबी गँग फिरत असून महिलांना दमदाटी करून, पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, इंदापूर येथे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ६३ विवाह मोठ्या दिमाखात पार पडले.

शुक्रवारी गोरज मुहूर्तावर, वरुणराजाच्या आशीर्वादात ‘वाघ पॅलेस’शेजारील भव्य शामियान्यात विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी शुभाशीर्वाद देताना रोहित पवार यांनी राजकीय टोलेबाजी करत सध्या अजित पवार यांनी सुरू केलेल्या जन सन्मान यात्रा व यामध्ये वापरण्यात येत असलेल्या गुलाबी रंगाचा धागा पकडत राज्यात सध्या गुलाबी गँग फिरत असून महिलांना दमदाटी करून, पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा गंभीर आरोप केला.

यामध्ये सहभागी जोडप्यांना विवाहासाठीचे सर्व साहित्य हे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिले गेले. यावेळी नवरदेवाची शहरातून ढोल-ताशाच्या गजरात, डीजेच्या दणदणाटात ६३ अश्वांवर विराजमान होत काढण्यात आलेली वरात लक्षवेधी ठरली.   यावेळी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, उत्तमराव जानकर, यांच्यासह अन्य मान्यवर, वधू-वरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR