27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ११ जण बुडाले

राज्यात ११ जण बुडाले

पुणे येथे चौघांचा बुडून मृत्यू सिंधुदुर्गात २ मृतदेह सापडले, २ जणांचा शोध सुरू

मंचर(पुणे/सिंधुदुर्ग : पाण्यात जाणा-यांसाठी हा आठवडा धोक्याचा ठरला आहे. २ दिवसांपूर्वी उजनी जलाशयात बोट उलटून ६ प्रवासी गेले तर त्यानंतर नगरमध्ये ४ जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले बंदरात सुद्धा बोट पलटी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली बोट उलटल्याने ७ खलाशी बुडाले. यातील तिघांनी पोहून किनारा गाठला तर बाकीच्यांचा शोध सुरू आहे. तर पुण्यातील आंबेगावात शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे दुपारी साडेतीन वाजता घडली. श्रद्धा काळू नवले (१३),सायली काळू नवले (११), दीपक दत्ता मधे (७) राधिका नितीन केदारी (१४) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. मूळचे जवळे बाळेश्वर (संगमनेर)येथील कामगार गोरक्षनाथ बबन कवठे हे पत्नी ज्योती, दत्तक मुली श्रद्धा काळू नवले व सायली काळू नवले यांच्यासमवेत निरगुडसर येथे राहून मजुरीचे काम करत होते. तर मूळचे कानेवाडी(ता. खेड) येथील तीन कुटुंब कामासाठी निरगुडसर येथे आले सर्वजण पोंदेवाडी येथे शेतात काम करण्यासाठी गेले होते. मुले दीपक मध्ये व राधिका केदारी हे घरीच होते. दुपारी श्रद्धा नवले, सायली नवले, दीपक मधे, राधिका केदारी हे चौघे पोहण्यासाठी नजीक असलेल्या शेततळ्यात गेले. शेततळ्यात पाच ते सात फूट पाणी होते. पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्याच दरम्यान काल रात्री वेंगुर्ले बंदरात मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन बोट घेऊन जात असताना अचानकपणे ती बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहत पोहत किनारपट्टी गाठली मात्र बाकीचे ४ जण मात्र बेपत्ता झाले. यातील २ जणांचे मृतदेह सापडले तर दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्री ढगांचा गडगडाट, जोरदार वादळी वा-यामुळे ही बोट भरकटली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्य प्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले.

राज्यात आतापर्यंत ६ मोठ्या घटना
मागील ३ दिवसांत बोट बुडाल्याची ही तिसरी घटना असून बुडून मृत्यूच्या राज्यात ६ मोठ्या घटना घडल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR