22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे गोंधळलेले नेते

राज ठाकरे गोंधळलेले नेते

मुंबई : प्रतिनिधी
ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. दोन पक्षांत भांडण लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणावरून भाजपवर केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचा काल ठाण्यात मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरू केली. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यातल्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं, यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. यावरीत अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत, मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना-मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे, ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. दोन पक्षांत भांडण लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे.

ठाण्यात घडलेल्या या घटनेनंतर आता दोन्ही ठाकरे आहेत, एकमेकांना कोण पुरून उरणार ते पहावं लागणार आहे. महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे हे राज्य आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR