28.5 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeमहाराष्ट्रराम मंदिर उद्घाटनाचे राज ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही

राम मंदिर उद्घाटनाचे राज ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज ठाकरेंना कुठल्याही प्रकारचे निमंत्रण नाही अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडून प्रसारमाध्यमांना मिळाली आहे. राज ठाकरेंना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजनांनी दिली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे.

राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारीला पार पडणार आहे. काल गिरीश महाजनांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे. राज ठाकरेंना अद्याप निमंत्रण आलेले नाही. परंतु निमंत्रण लवकरच येण्याची शक्यता आहे. निमंत्रण आल्यानंतर राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार का? हा देखील सवाल आहे. कारण यापूर्वी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा आखला होता. मात्र बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला विरोध केला होता.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरेंनी अयोध्या दौरा टाळला होता. त्यानंतर बृजभूषण सिंह यांनी अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले होते. आता जर राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण आले तर राज ठाकरे उद्घाटन सोहळ्याला जातील, अशी माहिती राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी दिली आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR