21 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeलातूरराष्ट्रपतींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा

राष्ट्रपतींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा

लातूर : प्रतिनिधी
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत संतापजनक वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे. अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु, केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असून आता राष्ट्रपतींनीच या प्रकरणात हस्तक्षेप करुन अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दि. २४ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून दुचाकी रॅलीस सुरुवात झाली. प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या विनंम्र अभिवादन केले. दुचाकी रॅली मेन रोडने लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक, एक नंबर चौक, पाच नंबर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचली. तेथे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचे निवेदन
दिले.
या दुचाकी रॅलीत माजी आमदार वैजनाथराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. फारुक शेख, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सुळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, दगडुअप्पा मिटकरी, अ‍ॅड. देविदास बोरुळे-पाटील, समद पटेल, अहेमदखॉ पठाण, नामदेव इगे, युनूस मोमीन, मारोती पांडे, संजय ओव्हळ, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, अतिष चिकटे, राजू गवळी, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, सचिन बंडापल्ले, यशपाल कांबळे, विद्याताई पाटील, लक्ष्मीताई बटनपूरकर, सुभाष घोडके.  कैलास कांबळे, नागसेन कामेगावकर, पप्पू देशमुख, रविशंकर जाधव, धोंडीराम यादव, विजयकुमार साबदे, जालिंदर बरडे, कुणाल वागज, फारुक शेख, पवन गायकवाड, असलम शेख, सिराज शेख, आसिफ बागवान, अजिज बागवान, एन. ए. इनामदार, आयुब मणियार, गोरोबा लोखंडे,
 ख्वॉजापाशा शेख, डॉ. बालाजी साळूंके, जमालोद्दिन मणियार, राम गोरड, गणेश एसआर देशमुख, गिरीश ब्याळे, सोनू डगवाले, कुणाल शृंगारे, राम स्वामी, अभिजीत इगे, रमाकांत गडदे, राम सूर्यवंशी, बालाजी झिपरे, जय ढगे, सुंदर पाटील कव्हेकर, सागर मुसांडे, फैसल कायमखानी, विष्णु धायगुडे, अ‍ॅड. किसनराव शिंदे, मोहन सूरवसे, अखिल शेख, सुरेश चव्हाण, युनूस शेख, राज क्षीरसागर, अकबर माडजे, पवन सोलंकर, अ‍ॅड. सुमित खंडागळे, अ‍ॅड. शरद देशमुख, अक्षय मुरळे, प्रविण घोटाळे, राहूल डूमणे, काशिनाथ वाघमार,े राजेश गुंठे, अक्रम बोरीकर, अ‍ॅड. प्रविण पाटील, महेश कोले, रत्नदीप अजनीकर, प्रा. राजकुमार जाधव, विजय टाकेकर, धनंजय शेळके, रविंद्र माने, विजय देशमुख, बाळासाहेब देशमुख, एम. एच. शेख, लक्ष्मीनारायण नावंदर, हमीद बागवान, पिराजी साठे, सिकंदर पटेल, मैनोद्दिन शेख, अमर पाटील, सत्यवान कांबळे, विकास वाघमारे, सूपर्ण जगताप, अमित जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR