मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन आहे. यामुळे दोन्ही गट वर्धापन दिन थाटामाटात साजरा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नगरमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे तर अजित पवार गट मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा करणार आहे. दरम्यान, यावेळी शरद पवार गटामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे दादा गटामध्ये केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे काहीस दु:खाच वातापरण असणार आहे. दादा गटाला मंत्रिपद मिळाले असते तर वर्धापन दिन दिमाखात झाला असता असे काही कार्यकत्यांचे म्हणणे आहे.
देशात नुकतीच १८ वी सार्वत्रिक निवडणुक पार पडली. ही निवडणुक महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरली. कारण पक्षफुटीनंतर शरद पवार गटाने नव्या चिन्हासह प्रथमच लोकसभा निवडणुक लढवली आणि सर्वाना आर्श्चय चकित करणारे यश मिळवले. शरद पवार गटाने महाविकास आघाडी सोबत लोकसभा निवडणुकीत १० जागांवर निवडणुक लढवली आणि ८ जागावर विजय मिळवला.
तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने पक्षाच्या मुळ घड्याळाच्या चिन्हासह ४ जागावर निवडणुक लढवली, मात्र त्यांना एका रायगडच्या जागेवरच विजय मिळवला. परिणामी त्यांना केंद्रात एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. यामुळे पक्षाच्या २५ वर्धापन दिनी शरद पवार गटात खुशी तर दादा गटात गम असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.