सोलापूर :
राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महापालिकेतील माजी गटनेते किसन जाधव यांची निवड करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी रायगड येथील गीताबाग या निवासस्थानी नियुक्तिपत्र दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली आहे. राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षाची ताकद वाढविण्याबरोबरच अजित पवार यांचे हात बळकट करणार असल्याची ग्वाही किसन जाधव यांनी निवडीनंतर दिली.